Baramati Accident | रिक्षाच्या धडकेत ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, आजी जखमी – चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

                पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती:प्रतिनिधी 

                      बारामती शहराजवळील गुणवडी येथे शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. आपल्या आजीसोबत घरी जाणाऱ्या ५ वर्षीय अथर्व अभिजीत लोढे याचा मालवाहतूक रिक्षाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याची आजी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.


घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. अथर्व हा आपल्या आजी सुरेखा अनिल लोढे यांच्यासमवेत रस्ता ओलांडत असताना डोर्लेवाडीकडे जाणाऱ्या मालवाहतूक रिक्षाने (क्र. एमएच ४२ एम ४२०२) जोरदार धडक दिली. यात बालकाचा मृत्यू झाला.


या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी रिक्षाचालक संदीप बाळासो भागवत (रा. डोर्लेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



Post a Comment

0 Comments